BNSP


Bachat Gat

बचत गट ची सुरुवात :-

महिलांच्या आर्थिक व कौटुंबिक प्रगतीसाठी महिला अबला नसुन त्या सबला आहेत हे ध्येय उराशी बाळगत पतसंस्थेने सन २०११-२०१२ मध्ये जॉइंट लायबिलीटी ग्रुप (बचत गट ) ची स्थापना केली.हातात "हात गरजूला साथ" या उदिष्टानुसार संस्थेने व्यवसाय करणाऱ्या २० महिलांच्या एका समुहास दि. १० सप्टें. २०११ रोजी प्रत्येकी रु.१०,०००/- या प्रमाणे एकुण रु.२,००,०००/- लाखाचे कर्ज वाटप करून खऱ्या अर्थाने महिलांना समाजात स्वाभिमानाने जगण्याचे पाठबळ दिले.

संस्थेचेउद्देश :-

१ महिलांना समाजात स्वाभिमानाचा दर्जा मिळावा.

२ कुटुंबास हातभार लागावा.

३ बचतीची सवय लागावी.

४ स्वावलंबी बनून आर्थिक स्थैर्य उंचवावे.

५ राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे.

६ सामाजिक उपक्रमात महिलांचा सह्भाग वाढावा.

७ बँक व्यवहारांची सवय लागावी.

८ सेवा वस्ती भागातील महिलांची समाजात पत निर्माण व्हावी.

बचत गट ची कर्ज वाटप :-

एकाच विभातील महिलांचा समुह तयार केला जातो यात व्यवसाय करणाऱ्या महिला व व्यवसाय इच्छुक महिलांचा समावेश केला जातो. त्या ठिकाणी संस्थेचे प्रतिनिधी जावून संस्थेची माहिती देवून त्यांचा सुरु असलेला व्यवसाय वाढी साठी तसेच महिलांना व्यवसाय स्रुरू करण्यासाठी लागणाऱ्या कर्जाबाबत माहिती दिली जाते. सुरुवातीचे कर्ज आवश्यक ती पुर्तता करून घेवूनरु.१०,०००/-प्रती महिला दिले जाते. त्याचा परतफेडीचा कालावधी ५० ते ५२ आठवडे (१ वर्ष) असतो.

अशा प्रकारे टप्प्या टप्याने रु.१०,०००/- पासून ते रु.४०,०००/- प्रती महिला  सदस्यांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे. म्हणजेच एका समूहास रु.८,००,०००/- पर्यंत संस्थेने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. संस्थेने माहे डिसें.१९ पर्यंत शहरातील सुमारे ५००० महिला सदस्यांना रु. 10 कोटी ९६ लाख ५० हजार इतके कर्ज वाटप केली आहे.

Mobirise
Mobirise
Mobirise

All Rights Reserved @ balwantpatsanstha.com