ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही पेन्शन योजना असून ही केंद्र सरकार-समर्थित सेवानिवृत्ती पश्चात निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना खात्रीचा परतावा देणारी गुंतवणूक आहे. अल्प बचत योजनेतील ही सर्वोच्च परतावा देणारी गुंतवणूक असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली आहे. भारतातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे या योजनेत एकरकमी गुंतवणूक करू शकतात आणि कर सवलतींसह नियमित उत्पन्न मिळवू शकतात. पेन्शन योजनेचे लाभ मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक पेन्शन खाते बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेत उघडू शकतात.