BNSP


HISTORY

Mobirise

बळवंत नागरी सहकारी पतसंसंस्थेने सामान्य आणि आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील जनतेची समाजात पत निर्माण व्हावी. तसेच सावकारी पाशातून आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी त्यांना आर्थिक गरजांची पूर्तता करून व्यवसायात चालना देवून रोजगार निर्मिती व्हावी असे ध्येय उराशी बाळगून पतसंस्थेची स्थापना झाली.

आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य करून त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्नकरणे अशा विचार मंथनातून दिनांक ३१ डिसें. २००० रोजी बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जळगाव या संस्थेची विधीवत स्थापना झाली. "हातात हात गरजूला साथ'' हे ब्रीद जोपासुन सभासदांनी तसेच ग्राहकांची आर्थिक स्थिती संपन्न करण्याच्या दृष्टीने पतसंस्था गेल्या २३ वर्षापासून समाजातील तळागाळातील आर्थिक दुर्बल घटकांना कर्जरूपी आर्थिक सहाय्य करून त्यांच्या विकासात गती देण्याचे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचे महत्वाचे कार्यकरीत आहे. तसेच ठेवीदारांना उत्तम सेवा देवून त्यांचा विश्वास संपादन करून आर्थिक जगतात स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याची अवघड वाटणारी कामगिरी बळवंत परिवाराने यशस्वीरित्या पार पाडीत यश संपादन केले आहे.

संस्थेचे उद्देश :-         

उपविधी क्र.अ १.१ ब नुसार संस्थेचे उद्देश खालील प्रमाणे आहेत.

अ) सभासदांना काटकसर व सहकारी तत्वांचे पालन करण्याचे प्रोत्साहन देणे.

ब) लघुउद्योग व गृहउद्योग आणि स्वयंरोजगार वृद्धिंगत होण्यासाठी कर्जपुरवठा करणे.

संस्थेची ठळक वैशिष्टे

०१) संस्था स्थापने पासून नफ्यात. 

०२) संस्थेने आजपर्यंत केलेली गुंतवणूक अनुत्पादित नाही.

०३) निव्वळ एन.पी.ए.शून्य %.

०४) स्थापने पासून सर्व पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

०५) संस्थेच्या स्थापने पासून सभासदांना १५% दराने लाभांश.

०६) ठेवीदारांच्या ठेवी १००% सुरक्षित ; जितक्या ठेवीतितकी गुंतवणूक.

०७) संस्थेच्या स्वमालकीच्या इमारतीत मुख्य कार्यालय.

०८) संस्थेवर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई नाही.

०९) संयुक्त जबाबदारी समुह (बचत गट) सुरु करणारी खान्देशातील पहिली पतसंस्था.

१०) मुख्य कार्यालय व सर्व शाखा संगणीकृत.

११) दैनंदिन रोख तरलता प्रमाण (सी.आर.आर.) व वैधानिक तरलता निधी (एस.एल.आर.) चे नियोजन.

१२) संस्थेच्या ग्राहकांचे के.वाय.सी. नियमावलीचे पालन करूनच खाते उघडले जाते.

१३) संस्थेच्या कामकाजा विषयी कायदा/उपविधीतील तरतुदीनुसार व सहकार खात्याने दिलेल्या विवरण पत्राची आणि सहकार खात्याच्या वार्षिक निरीक्षणा संबंधी वेळोवेळी माहिती दिली जाते.


All Rights Reserved @ balwantpatsanstha.com