BNSP


PIGMY

पिग्मी/ दैनंदिन ठेव योजना

आजच्या छोट्याश्या गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. म्हणूनच स्वतःला छोट्या छोट्या बचतीची सवय लावायला हवी. याच विचारातून आम्ही एक तरतूद केली आहे. रोजंदारीवर काम करणारे कामगार, लहानसहान व्यापारी आणि शेतकऱ्यांना बचतीची सवय लागावी तसेच त्यांच्या लग्न, घर खरेदी, वाहन खरेदी अशा मोठ्या भांडवली गरजा वेळीच भागवण्यासाठी मोठी रक्कम साठवली जावी म्हणून बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेने पिग्मी अर्थात दैनंदिन ठेव योजना सुरू केली. या योजनेत रोजच्यारोज अगदी कमीत कमी रक्कम गुंतवून उद्या एकत्रितपणे एका मोठ्या रकमेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

छोट्या छोट्या बचतीतून पूर्ण करा स्वप्नांचा महासागर! पिग्मी / दैनंदिन ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

पिग्मी ठेव

वैशिष्ट्ये आणि लाभ

• किमान रु. 100/- भरून सुलभ संचय योजनेचे खाते उघडता येते.

• पिग्मी ठेव रक्कमेवर जमा रक्कमेच्या ८० % रक्कम उचल मिळू शकेल.

• पिग्मी ठेव योजने अंतर्गत पतसंस्थेचा पिग्मी प्रतिनिधि आपला व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन रक्कम जमा करेल.

• बँकेत बचत किंवा चालू खाते असल्यास कोणत्याही कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय पिग्मी ठेव योजनेचे खाते उघडता येईल.

आवश्यक कागदपत्रे

1. 1 फोटो

2. पत्त्याचा पुरावा – आधार कार्ड, वीजबील, टेलीफोन बील

3. पॅनकार्ड झेरॉक्स

All Rights Reserved @ balwantpatsanstha.com