बळवंत नागरी सहकारी पतसंसंस्थेने सामान्य आणि आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील जनतेची समाजात पत निर्माण व्हावी. तसेच सावकारी पाशातून आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी त्यांना आर्थिक गरजांची पूर्तता करून व्यवसायात चालना देवून रोजगार निर्मिती व्हावी असे ध्येय उराशी बाळगून पतसंस्थेची स्थापना झाली.
आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य करून त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्नकरणे अशा विचार मंथनातून दिनांक ३१ डिसें. २००० रोजी बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जळगाव या संस्थेची विधीवत स्थापना झाली. "हातात हात गरजूला साथ'' हे ब्रीद जोपासुन सभासदांनी तसेच ग्राहकांची आर्थिक स्थिती संपन्न करण्याच्या दृष्टीने पतसंस्था गेल्या २३ वर्षापासून समाजातील तळागाळातील आर्थिक दुर्बल घटकांना कर्जरूपी आर्थिक सहाय्य करून त्यांच्या विकासात गती देण्याचे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचे महत्वाचे कार्यकरीत आहे. तसेच ठेवीदारांना उत्तम सेवा देवून त्यांचा विश्वास संपादन करून आर्थिक जगतात स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याची अवघड वाटणारी कामगिरी बळवंत परिवाराने यशस्वीरित्या पार पाडीत यश संपादन केले आहे.
आम्ही, बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जळगाव अशी सेवा देणारी पतसंस्था होऊ इच्छितो जी बँकिंग परिघाबाहेर असलेल्या लोकांसाठी आणि छोटया उद्योगांसाठी जवळची ठरावी ज्यायोगे समाजाचे उत्थान घडवता येईल.
आम्ही, बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जळगाव जनतेला प्राध्यान्याने व त्यांच्या गरजेनुसार आर्थिक सेवा देण्यास कटिबध्द आहोत.
जबाबदार आणि सक्रिय संवाद.
पारदर्शकता.
आदर्श कार्यप्रणाली.